Pune : Female Police Constable Rape in Pune शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायाला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिला पोलीस शिपायाला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने, लॅपटाॅप चोरल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दीपक सीताराम मोघे (रा. स्वारगेट पोलीस वसाहत) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिला पोलीस शिपायाने खडक पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पीडित महिला आणि मोघे यांची ओळख होती. टाळेबंदी मध्ये मोघे हा महिला पोलीस शिपायाच्या घरी जेवायला जात असत. त्यावेळी मोघेने महिलेला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले. तिच्यावर बलात्कार करुन ध्वनिचित्रफीत तयार केली.
त्यानंतर ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. महिला पोलीस शिपायावर वेळोवेळी अत्याचार केले. तिला धमकावून पतीसोबत घटस्फोट घेण्यास भाग पाडले. तिला पिस्तुलीने घाबरवून घरातील पाच ते सहा तोळे दागिने, मोबाइल संच, लॅपटाॅप असा मुद्देमाल चोरला. महिलेने नुकतीच खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनैसर्गिक कृत्य, बलात्कार, तसेच जिवेमारण्या प्रकरणी मोघे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक या प्रकरणावर तपास करत आहेत.

Pune news : पुणे रेल्वे स्थानकावरुन कोकणात जाण्यासाठी स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे पुणे ते कोकण प्रवास आरामदायी होणार आहे. रेल्वेचा पर्याय नसता तर घाट मार्गाने कोकणात पुण्यावरुन जावे लागते.
Pune| 28 ऑगस्ट 2023 : गणेशोत्सवासाठी फर कामी दिवस राहिले आहेत. कोकणातील रहिवाशी गणोशोत्सवात गावी जातात. त्यांना रेल्वेने चांगली बातमी दिली आहे. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवासांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय पुणे रेल्वेने घेतला आहे. यामुळे पुणे शहरातून कोकणात जाण्यासाठी बस प्रवासाशिवाय रेल्वेचा आरामदायक प्रवास करता येणार आहे. या गाड्यांच्या तारखा आणि वेळेपत्रकही पुणे रेल्वे विभागाने जाहीर केले आहे.
कधी असणार विशेष रेल्वे
पुणे रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सव कोकणातील लोकांना गावी जाता यावे यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येतात. त्यासाठी ‘गणपती विशेष रेल्वे गाड्या’ गेल्या काही वर्षांपासून सोडल्या जात आहेत. मुंबईनंतर आता पुणे मधूनही कोकणसाठी विशेष गाड्या सुटणार आहे. १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी या स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

गाड्यांना कुठे असणार थांबा

पुणे रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या स्पेशल गाड्यांना पुणे, लोणावळा, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

काय आहे वेळापत्रक

पुणे-कुडाळ ही विशेष रेल्वेगाडी १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी पुणे स्थानकापासून सुटणार आहे. ही स्पेशल गाडी सायंकाळी ६.१५ वाजता सुटणार आहे.
परतीच्या प्रवासासाठी कुडाळवरुन पुणे अशी विशेष रेल्वे १७ आणि २४ सप्टेंबर त्यानंतर एक ऑक्टोबर रोजी धावणार आहे. ही रेल्वे कुडाळ स्थानकामधून दुपारी ४.०५

वाजता सुटणार आहे.

Mumbai वरुन एक लाख भक्तांचे तिकीट कन्फर्म
पुणे रेल्वे स्थानकप्रमाणे मुंबईमधूनही स्पेशल रेल्वे सोडण्यात आल्या आहे. मुंबईवरुन गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या रेल्वेसाठी 1 लाख 4 हजार गणेश भक्तांची तिकीट एक कन्फर्म झाले आहे. या माध्यमातून रेल्वेला 5 कोटी 13 लाखांची कमाई झाली आहे. यंदा 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होतो. त्यासाठी मोठ्या संख्येने कोकणवासीय गावी जाणार आहेत.

 

Pune-Mumbai द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली.
Pune : Pune-Mumbai अंतर पुढील काही वर्षात १३ किलोमीटरने कमी होणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री भुसे यांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या (मीसिंग लिंक) कामाची गुरुवारी पाहणी केली. त्यानंतर बोलताना भुसे म्हणाले, ‘द्रुतगती महामार्गावरील १३.३ किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाचा प्रकल्प आहे. या अंतर्गत १.६७ किलोमीटर आणि ८.९२ किलोमीटर अंतराचे दोन बोगदे आहेत. या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सुरक्षितेतच्या दृष्टीकोनातून जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या मिसिंग लिंकवर १८० मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आणि सर्वात जास्त रुंदीचा बोगदा बांधण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे लोणावळा, खंडाळा परिसरातील वाहतूक कोंडी खुप कमी होणार असून प्रवाशांची वेळ बचत होणार आहे.
दरम्यान, पाहणी आधी कुसगाव येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रकल्पाच्या कामाविषयी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यामध्ये प्रकल्पाची लांबी, रुंदी, उंची, किंमत, तसेच मार्गिका, वाहनाची वेग मर्यादा, वाहतूक कोंडी, सुरक्षितता, पाण्याचा निचरा, कामाचा दर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आदीबाबत माहिती देण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता राजेश पाटील आदी या वेळी उपस्थित होते.