“Samruddhi Mahamarg Drives Progress and Connectivity, Shaping Dreams on the Road.”
Nashik : As the Samruddhi expressway nears its final phase, the ambitious 701 km highway linking Nagpur and Mumbai is poised for completion in 2024. The imminent traffic movement on the 23 km stretch from Bharvir to Igatpuri in Nashik, expected as early as February, marks a significant milestone.
This super expressway aims to streamline travel between the two major cities, with the remaining 78 km from Igatpuri to Amine village in Thane set to be finalized by July 2024. The impending culmination of this extensive project is anticipated to usher in a new era of improved connectivity and reduced travel times for commuters.
The ongoing construction of 15 viaducts, including the impressive 84m tall, 1.8km long structure in Shahpur, Thane, is a key development along the 78km Samruddhi Mahamarg. The plan includes opening the 23km section connecting Mumbai and Thane for vehicles, utilizing the Igatpun connector linked to the Mumbai-Agra National Highway. Anticipating completion by July next year, MSRDC officials affirm that the entire expressway will be operational after finishing this stretch’s construction.

 

IND vs BAN Asia cup 2023

: टीम इंडिया फायनलमध्ये पोहचली आहे. विजेतेपदाच्या सामन्याआधी आज होणारी मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. फायनलआधी आजचा सामनाही टीम इंडियासाठी तितकाच महत्त्वाचा असेल का? जाणून घ्या.
कोलंबो : टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर टीम इंडियाचा बांग्लादेश विरुद्ध सामना होणार आहे. super-4 फेरीतला हा शेवटचा सामना आहे. बांग्लादेशची टीम फायनलच्या शर्यतीतून आधीच बाद झाली आहे. पण टीम इंडियाला फायनलआधी आजच्या सामन्यात बांग्लादेशला कमी लेखण्याची चूक महाग पडू शकते. यामुळे टीम इंडियाची विजयाची लय बिघडू शकते. बांग्लादेशमध्ये टीम इंडियाला हरवण्याची क्षमता आहे. असं झाल्यास फायनलआधी इंडियन टीमची लय बिघडू शकते. कॅप्टन रोहित शर्मा समोर सुद्धा प्रश्न असेल, की सध्याची विनिंग प्लेइंग इलेव्हन कायम ठेवायची की, आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये न खेळलेल्या खेळाडूंना संधी द्यायची. टीममध्ये काही बदल होऊ शकतात, असे संकेत गोलंदाजी कोच पारस महाम्ब्रे यांनी दिले आहेत.
टीम इंडियामध्ये दोन खेळाडूंची एन्ट्री पक्की मानली जात आहे. श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट आहे. नेट्समध्ये त्याने फलंदाजीसोबत गोलंदाजीचा सुद्धा सराव केला. त्याचं खेळणं निश्चित मानलं जात आहे. मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीला टीममध्ये स्थान मिळू शकतं. या दोन बदलांमुळे टीम इंडियावर जास्त परिणाम होणार नाही. दोन्ही खेळाडूंना वर्ल्ड कपआधी मॅचमध्ये खेळण्याची सुद्धा संधी मिळेल. अय्यरला टीममध्ये समावेश केल्यास इशान किशनला बाहेर बसवलं जाऊ शकतं. फायनलआधी आपली विजयी लय कायम ठेवण्याच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. वर्ल्ड कपआधी काही खेळाडूंना मॅच टाइम मिळेल, ते सुद्धा तितकच महत्त्वाच आहे.

दोघांनी जास्तीत जास्त खेळणं टीम इंडियासाठी महत्त्वाच

केएल राहुल सुरुवातीच्या दोन सामन्यात खेळला नव्हता. पुनरागमन करताना त्याने पाकिस्तान विरुद्ध दमदार शतक ठोकलं. श्रीलंकेविरुद्ध चांगल्या सुरुवातीला मोठ्या इनिंगमध्ये बदलता आलं नाही. राहुल दुखापतीमुळे बरेच महिने टीमच्या बाहेर होता. मोठ्या ब्रेकनंतर परतल्यामुळे राहुलला जितके सामने खेळण्याची संधी मिळेल, ते टीमसाठी चांगलं आहे. जसप्रीत बुमराहची सुद्धा हीच स्थिती आहे. बुमराहने एक वर्षानंतर टीममध्ये पुनरागमन केलय. आशिया कपमध्ये बुमराह आतापर्यंत दोन सामने खेळलाय. वर्ल्ड कप आधी त्याने सुद्धा जास्तीत जास्त सामने खेळणं महत्त्वाच आहे.

Pune : Female Police Constable Rape in Pune शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायाला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिला पोलीस शिपायाला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने, लॅपटाॅप चोरल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दीपक सीताराम मोघे (रा. स्वारगेट पोलीस वसाहत) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिला पोलीस शिपायाने खडक पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पीडित महिला आणि मोघे यांची ओळख होती. टाळेबंदी मध्ये मोघे हा महिला पोलीस शिपायाच्या घरी जेवायला जात असत. त्यावेळी मोघेने महिलेला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले. तिच्यावर बलात्कार करुन ध्वनिचित्रफीत तयार केली.
त्यानंतर ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. महिला पोलीस शिपायावर वेळोवेळी अत्याचार केले. तिला धमकावून पतीसोबत घटस्फोट घेण्यास भाग पाडले. तिला पिस्तुलीने घाबरवून घरातील पाच ते सहा तोळे दागिने, मोबाइल संच, लॅपटाॅप असा मुद्देमाल चोरला. महिलेने नुकतीच खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनैसर्गिक कृत्य, बलात्कार, तसेच जिवेमारण्या प्रकरणी मोघे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक या प्रकरणावर तपास करत आहेत.

Pune News : देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे नाशिक आणि पुणे मध्ये सुरु होणार असल्याची घोषणा झाली. परंतु हा प्रकल्प रखडला होता. आता या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
Pune | 24 ऑगस्ट 2023 : नाशिकहून सरळ पुणे शहरात (Nashik- Pune) जाण्यासाठी रेल्वे नाही. म्हणूनच या मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेनची (Pune Nashik high Speed Train) घोषणा झाली. या रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाकडूनही परवानगी दिली आहे. महारेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (महारेल) कडून या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु या प्रकल्पाची सर्व कामे धिम्यागतीने होत आहे. म्हणूनच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
काय दिले आदेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यासाठी हातपाय चालवला घेतले आहे. यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकी मध्ये पुणे-नाशिक लोहमार्गाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुणे, नाशिक रेल्वे मार्गाची मागणी मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठक घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यातील अडचणी दूर करा, असे आदेश अजित पवार यांनी दिले.
कधीपासून रखडला प्रकल्प
गेल्या पंचवीस वर्षांपासून पुणे, नाशिक रेल्वे मार्गाचा प्रकल्प रखडलेला आहे. यासंदर्भात अनेकवेळा घोषणा झाल्या. परंतु प्रत्यक्षात कामे सुरु झाली नाहीत. तसेच सुरु झालेली कामे संथगतीने होत आहे. यामुळे पुणे-नाशिक रेल्वे मार्ग मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासारखा होणार आहे का? हा प्रश्न विचारला जात आहे.
सुटीचा आनंद घेण्यासाठी फिरायला गेलेले, तरुणाची ही सुटी शेवटची ठरली
काही मित्र दुचाकीने फिरायला गेले होते. फिरण्याच्या नादात एका युवकाने दुचाकी थेच कारवर चालवली. या मध्ये दुचाकी तसेच कारचे मोठे नुकसान झाले.
नांदेड : देशात स्वातंत्र्यदिनानिमित्त आनंदाचे वातावरण होते. ध्वजारोहण झाल्यानंतर बरेच लोकं हे बाहेर फिरायला गेले होते. पर्यटनस्थळांवर गर्दी झाली होती. काही लोकांनी रस्त्यावर आनंद व्यक्त केला. काही तरुण दुचाकी चालवत असतांना तिरंगा हातात घेऊन फिरत होते. यामुळे काही ठिकाणी दुर्घटनासुद्धा घडल्या. अशीच एक दुर्घटना नांदेडमध्ये (Nanded) घडली. काही मित्र दुचाकीने फिरायला गेले होते. फिरण्याच्या नादात एका युवकाने दुचाकी थेच कारवर चालवली. यात दुचाकी तसेच कारचे मोठे नुकसान झाले. शिवाय युवकाचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकी कारवर आदळली
स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्यामुले आठ ते दहा दुचाकीवरुन काही मित्र फिरायला निघाले होते. त्यातील एकाची भरधाव दुचाकी कारवर आदळली. यात एका युवकाचा मृत्यू झाला. आज दुपारी नांदेड शहरातील पश्चिम वळण रस्त्यावरील पुलावर ही घटना घडली. रोहित मुदिराज ह्या २६ वर्षाच्या युवकाचं नाव आहे आणि त्याचं मृत्यू झालं आहे.