IND vs BAN Asia cup 2023

: टीम इंडिया फायनलमध्ये पोहचली आहे. विजेतेपदाच्या सामन्याआधी आज होणारी मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. फायनलआधी आजचा सामनाही टीम इंडियासाठी तितकाच महत्त्वाचा असेल का? जाणून घ्या.
कोलंबो : टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर टीम इंडियाचा बांग्लादेश विरुद्ध सामना होणार आहे. super-4 फेरीतला हा शेवटचा सामना आहे. बांग्लादेशची टीम फायनलच्या शर्यतीतून आधीच बाद झाली आहे. पण टीम इंडियाला फायनलआधी आजच्या सामन्यात बांग्लादेशला कमी लेखण्याची चूक महाग पडू शकते. यामुळे टीम इंडियाची विजयाची लय बिघडू शकते. बांग्लादेशमध्ये टीम इंडियाला हरवण्याची क्षमता आहे. असं झाल्यास फायनलआधी इंडियन टीमची लय बिघडू शकते. कॅप्टन रोहित शर्मा समोर सुद्धा प्रश्न असेल, की सध्याची विनिंग प्लेइंग इलेव्हन कायम ठेवायची की, आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये न खेळलेल्या खेळाडूंना संधी द्यायची. टीममध्ये काही बदल होऊ शकतात, असे संकेत गोलंदाजी कोच पारस महाम्ब्रे यांनी दिले आहेत.
टीम इंडियामध्ये दोन खेळाडूंची एन्ट्री पक्की मानली जात आहे. श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट आहे. नेट्समध्ये त्याने फलंदाजीसोबत गोलंदाजीचा सुद्धा सराव केला. त्याचं खेळणं निश्चित मानलं जात आहे. मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीला टीममध्ये स्थान मिळू शकतं. या दोन बदलांमुळे टीम इंडियावर जास्त परिणाम होणार नाही. दोन्ही खेळाडूंना वर्ल्ड कपआधी मॅचमध्ये खेळण्याची सुद्धा संधी मिळेल. अय्यरला टीममध्ये समावेश केल्यास इशान किशनला बाहेर बसवलं जाऊ शकतं. फायनलआधी आपली विजयी लय कायम ठेवण्याच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. वर्ल्ड कपआधी काही खेळाडूंना मॅच टाइम मिळेल, ते सुद्धा तितकच महत्त्वाच आहे.

दोघांनी जास्तीत जास्त खेळणं टीम इंडियासाठी महत्त्वाच

केएल राहुल सुरुवातीच्या दोन सामन्यात खेळला नव्हता. पुनरागमन करताना त्याने पाकिस्तान विरुद्ध दमदार शतक ठोकलं. श्रीलंकेविरुद्ध चांगल्या सुरुवातीला मोठ्या इनिंगमध्ये बदलता आलं नाही. राहुल दुखापतीमुळे बरेच महिने टीमच्या बाहेर होता. मोठ्या ब्रेकनंतर परतल्यामुळे राहुलला जितके सामने खेळण्याची संधी मिळेल, ते टीमसाठी चांगलं आहे. जसप्रीत बुमराहची सुद्धा हीच स्थिती आहे. बुमराहने एक वर्षानंतर टीममध्ये पुनरागमन केलय. आशिया कपमध्ये बुमराह आतापर्यंत दोन सामने खेळलाय. वर्ल्ड कप आधी त्याने सुद्धा जास्तीत जास्त सामने खेळणं महत्त्वाच आहे.

या वस्तूची बाजारातील मूल्य तीन ते पाच हजार रुपये आहे. तसंच, २०२२ मध्ये ८३६ गटारांची झाकणं चोरी झाली आहेत. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचंही पालिकेने सांगितले आहे.
मुंबईतील(Mumbai) रस्त्यांवरचे उघड्या गटारांवर असलेली तब्बल ४०० झाकणं चोरीला गेली आहेत. ही आंकडेवारी जानेवारीपासून जुलै महिन्यात संचित केली आहे, मुंबई महानगरपालिकेने हि माहिती दिली आहे. म्हणजे, दर महिन्याला सरासरी ५७ झाकणे मुंबईत चोरीला जातात. याप्रकरणी मुंबई पालिकेने ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पावसाळ्यात रस्त्यावरील उघड्या गटारांवर झाकणे लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. गटारे उघडी राहिल्याने पावसाळ्यात अपघाताची शक्यता असते. साचलेल्या पाण्यातून जाताना गटारांचा अंदाज न आल्यास त्यात पाय अडकून पादचाऱ्यांचा जीव जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या गटारांवर झाकणे लावली जातात. ज्या ठिकाणी झाकणे नसतात तिथे सूचना म्हणून मोठी उभी काठी लावावी लागते.

गेल्यावर्षी सर्वाधिक चोरी
परंतु, ज्या ठिकाणी ही गटारांची झाकणं लावली जातात ती चोरीला जात असल्याचं निर्दशनास आलं आहे.या वस्तूची बाजारात मूल्य तीन ते पाच हजार रुपये आहे. तसंच, २०२२ मध्ये ८३६ झाकणं चोरी झाली आहेत. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचंही माहिती पालिकेने दिली आहे.
भंगार विक्रेत्यांना तंबी
झाकणं चोरीला जाण्याचं प्रमाण वाढल्यानंतर पालिकेने जून महिन्यांत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसंच, ही झाकणं विकत घेणाऱ्या भंगारविक्रेत्यांनाही इशारा देण्यात आला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सुटीचा आनंद घेण्यासाठी फिरायला गेलेले, तरुणाची ही सुटी शेवटची ठरली
काही मित्र दुचाकीने फिरायला गेले होते. फिरण्याच्या नादात एका युवकाने दुचाकी थेच कारवर चालवली. या मध्ये दुचाकी तसेच कारचे मोठे नुकसान झाले.
नांदेड : देशात स्वातंत्र्यदिनानिमित्त आनंदाचे वातावरण होते. ध्वजारोहण झाल्यानंतर बरेच लोकं हे बाहेर फिरायला गेले होते. पर्यटनस्थळांवर गर्दी झाली होती. काही लोकांनी रस्त्यावर आनंद व्यक्त केला. काही तरुण दुचाकी चालवत असतांना तिरंगा हातात घेऊन फिरत होते. यामुळे काही ठिकाणी दुर्घटनासुद्धा घडल्या. अशीच एक दुर्घटना नांदेडमध्ये (Nanded) घडली. काही मित्र दुचाकीने फिरायला गेले होते. फिरण्याच्या नादात एका युवकाने दुचाकी थेच कारवर चालवली. यात दुचाकी तसेच कारचे मोठे नुकसान झाले. शिवाय युवकाचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकी कारवर आदळली
स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्यामुले आठ ते दहा दुचाकीवरुन काही मित्र फिरायला निघाले होते. त्यातील एकाची भरधाव दुचाकी कारवर आदळली. यात एका युवकाचा मृत्यू झाला. आज दुपारी नांदेड शहरातील पश्चिम वळण रस्त्यावरील पुलावर ही घटना घडली. रोहित मुदिराज ह्या २६ वर्षाच्या युवकाचं नाव आहे आणि त्याचं मृत्यू झालं आहे.

Maharashtra News Live Today, 14 August 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बेत बिघडल्याने ते त्यांच्या सातारा येथील गावी गेले आहेत. तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीनंतर महाराष्ट्र म्हणजे गंमत जंमत नाही असं म्हणत सामनातून अग्रलेख लिहित टीका करण्यात आली आहे. तर शिंदे गटातले दहा आमदार नाराज असल्यामुळे ते ठाकरे गटात परतू शकतात असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसंच परत त्यांना आपल्या गटात घ्यायचं की नाही हा निर्णय उद्धव ठाकरेंचा असेल असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण २०१९ पासून वेगवेगळ्या वळणांवर गेलं आहे. गेल्या मागच्याच महिन्यात अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. तिथपर्यंत ही वळणं येतच होती. अशात आता पुढे आणखी काही घडामोडी घडतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच राज्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Most Century In Odis Since the 2019 World Cup: ICC The ODI World in 2023 will be held. या मोठ्या स्पर्धेच्या तयारी सर्व संघ करत आहेत. भारता मध्ये वर्ल्ड कप होणार आहे, पण त्याआधी २०१९ नंतर वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांना जाणून घेऊया.
(1 / 7)

टीम इंडिया वनडे वर्ल्डकपसाठी पूर्णपणे तयार आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारता विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी, २०१९ च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.

(2 / 7)

विराट कोहलीच्या नावावर ५ शतके आहेत – टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली २०१९ विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावली आहेत. विराटने या काळात ३९ सामने खेळले आहेत, आणि ५ शतके झळकावले आहेत.

(3 / 7)

शुभमनच्या नावावर ४ शतके आहेत – विराटच्या नंतर शुभमन गिलचा नंबर लागतो. शुभमन गिलने अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी धमाकेदार कामगिरी केली आहे. ODI मध्ये शुभमन गिलच्या नावावर ४ शतके आहेत, ज्यात त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुहेरी शतकाचाही समावेश पण आहे.

(4 / 7)

केएल राहुलने ३ शतके ठोकले आहेत – २०१९ विश्वचषकानंतर केएल राहुलच्या नावावर तीन शतके आहेत. २०१९ नंतर राहुलने ३१ एकदिवसीय खेळे आहेत, ज्यामध्ये त्याचे तीन शतके आहेत. मात्र, २०२० पासून तो दुखापतीमुळे संघातून आत आणि बाहेर आहे.

(5 / 7)

रोहितने ३ शतके झळकावले आहेत – रोहित शर्मासाठी २०१९ चा एकदिवसीय विश्वचषक खुप चांगला होता. पण तेव्हापासून त्याची कामगिरी घसरली आहे. तथापि, असे असूनही, २०१९ पासून आतापर्यंत त्याने वनडेमध्ये ३ शतके ठोकले आहेत.

(6 / 7)

श्रेयस अय्यरच्या नावावर २ शतके आहेत – या यादीत श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर आहे. अय्यरने टीम इंडियासाठी २ शतकी खेळी खेळली आहेत . मात्र, त्याच्या कामगिरीत कमालीचे सातत्य आले आहे. अशा स्थितीत आगामी विश्वचषकात त्याला संघात स्थान मिळू शकेल.
(7 / 7)

Odis After World Cup 2019 Most Century