IND vs BAN Asia cup 2023

: टीम इंडिया फायनलमध्ये पोहचली आहे. विजेतेपदाच्या सामन्याआधी आज होणारी मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. फायनलआधी आजचा सामनाही टीम इंडियासाठी तितकाच महत्त्वाचा असेल का? जाणून घ्या.
कोलंबो : टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर टीम इंडियाचा बांग्लादेश विरुद्ध सामना होणार आहे. super-4 फेरीतला हा शेवटचा सामना आहे. बांग्लादेशची टीम फायनलच्या शर्यतीतून आधीच बाद झाली आहे. पण टीम इंडियाला फायनलआधी आजच्या सामन्यात बांग्लादेशला कमी लेखण्याची चूक महाग पडू शकते. यामुळे टीम इंडियाची विजयाची लय बिघडू शकते. बांग्लादेशमध्ये टीम इंडियाला हरवण्याची क्षमता आहे. असं झाल्यास फायनलआधी इंडियन टीमची लय बिघडू शकते. कॅप्टन रोहित शर्मा समोर सुद्धा प्रश्न असेल, की सध्याची विनिंग प्लेइंग इलेव्हन कायम ठेवायची की, आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये न खेळलेल्या खेळाडूंना संधी द्यायची. टीममध्ये काही बदल होऊ शकतात, असे संकेत गोलंदाजी कोच पारस महाम्ब्रे यांनी दिले आहेत.
टीम इंडियामध्ये दोन खेळाडूंची एन्ट्री पक्की मानली जात आहे. श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट आहे. नेट्समध्ये त्याने फलंदाजीसोबत गोलंदाजीचा सुद्धा सराव केला. त्याचं खेळणं निश्चित मानलं जात आहे. मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीला टीममध्ये स्थान मिळू शकतं. या दोन बदलांमुळे टीम इंडियावर जास्त परिणाम होणार नाही. दोन्ही खेळाडूंना वर्ल्ड कपआधी मॅचमध्ये खेळण्याची सुद्धा संधी मिळेल. अय्यरला टीममध्ये समावेश केल्यास इशान किशनला बाहेर बसवलं जाऊ शकतं. फायनलआधी आपली विजयी लय कायम ठेवण्याच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. वर्ल्ड कपआधी काही खेळाडूंना मॅच टाइम मिळेल, ते सुद्धा तितकच महत्त्वाच आहे.

दोघांनी जास्तीत जास्त खेळणं टीम इंडियासाठी महत्त्वाच

केएल राहुल सुरुवातीच्या दोन सामन्यात खेळला नव्हता. पुनरागमन करताना त्याने पाकिस्तान विरुद्ध दमदार शतक ठोकलं. श्रीलंकेविरुद्ध चांगल्या सुरुवातीला मोठ्या इनिंगमध्ये बदलता आलं नाही. राहुल दुखापतीमुळे बरेच महिने टीमच्या बाहेर होता. मोठ्या ब्रेकनंतर परतल्यामुळे राहुलला जितके सामने खेळण्याची संधी मिळेल, ते टीमसाठी चांगलं आहे. जसप्रीत बुमराहची सुद्धा हीच स्थिती आहे. बुमराहने एक वर्षानंतर टीममध्ये पुनरागमन केलय. आशिया कपमध्ये बुमराह आतापर्यंत दोन सामने खेळलाय. वर्ल्ड कप आधी त्याने सुद्धा जास्तीत जास्त सामने खेळणं महत्त्वाच आहे.

Team India Squad : Asia Cup २०२३साठी भारताची टीमची घोषणा केली आहे; या संघाची स्पर्धा ३० ऑगस्टपासून सुरू होईल. आपल्याला मिळवण्याच्या ताज्या अपडेट्ससाठी, एक टचवर रहा!
New Delhi: आशिया कप २०२३ हा ३० ऑगस्टपासून सुरु होणारा. ही स्पर्ध पाकिस्तान आणि श्रीलंका ह्या दोन देशांमध्ये स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पहिला क्रिकेटचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ मध्ये होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानसोबत खेळणार आहे. भारतीय संगाचा पाकिस्तान आणि नेपाळसहित अ गटात समावेश आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका ब गटात आहेत. या आशिया चषकासाठी बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय संघाची घोषणा केली.
अपेक्षेप्रमाणे जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे, तर संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. भारतीय संघात तिलक वर्माची सरप्राईज एन्ट्री झाली आहे. नवी दिल्लीतील निवडन समितीच्या बैठकेनंतर, कर्णधार रोहित आणि मुख्य निवडणूक सदस्य अजित आगरकर, पत्रकार परिषदेत १७ सदस्यांच्या संघाची घोषणा केली.
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप).