“कोकणात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे, रायगडमध्ये एका केमिकल कंपनीत धाड टाकून तब्बल २१८ कोटी रुपये किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे”

 

मुंबईच्या वेशीवर रायगड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली

मुंबईच्या वेशीवर रायगड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली

“रायगड: कोकणात अमली पदार्थांचा विळखा पडला आहे. युवा पिढी या नशेच्या आहारी जातानाचं वास्तव,अनेक ठिकाणी समोर येऊ लागलं आहे, यामध्ये कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई,आणि नवी मुंबई सहित अनेक परिसर या अमली पदार्थांच्या विरोधात कडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. ” या अमली पदार्थांच्या विरोधात कडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. रायगड पोलिसांनी खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल सुमारे २१८ कोटी रुपयांचा एमडी या महागड्या अमली पदार्थाचा साठा जप्त केल्याने अवघ्या कोकणातच नव्हे तर मुंबईच्या वेशीवरही मोठी खळबळ उडाली आहे. रायगड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अंचल केमिकल कंपनीत करण्यात आलेल्या कारवाईतून हा सगळा माल परदेशीही पाठवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.”